NBP NEWS 24,
NAGPUR.
नागपूर:- रविवार दिनांक 1 मे 2022 ला थोर क्रांतिकारक, कृषी तज्ञ आणि नूतन भारत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी ‘समाजभूषण’ हा पुरस्कार मा. श्री नितिनजी जयराम गडकरी यांना, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.मोहन गायकवाड पाटील यांना ‘शिक्षण भूषण’ व कृषी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सुनंदा सालोटकर जाधव यांना ‘कृषिभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक १ मेरोजी सायंकाळी सहा वाजता नूतन भारत विद्यालय अभ्यंकर नगर च्या प्रांगणात आयोजित करण्यात आल्या आहे. यावेळी डॉक्टर खानखोजे यांच्या जीवन कार्यावर डॉ. वंदना बडवाईक लिखित ‘असे होते खानखोजे’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री भाले,डॉ. शरद निंबाळकर, माजी आमदार अनिल सोले, डॉक्टर खानखोजे यांची नात डॉक्टर गीता सहानी हे उपस्थित राहतील. आयोजन समितीने सर्वांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आग्रह केला आहे.