माझ्या रक्तात आंबेडकर आहे; बुद्धाचे व बाबासाहेब विचार घेऊन कार्य करीत आहे
नागपूर समाचार : नागपूर 16 सप्टेंबर बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ऐतिहासिक धर्मांतर करून घेतलेल्याद्ध धम्म दिक्षा सोहळ्यात समाजाला दिलेल्या 22 प्रतिज्ञांचा आम्हाला अभिमान असून या 22 प्रतिज्ञा बौद्ध आदर्श जीवनमार्ग शिकविणाऱ्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आम्हाला मान्य असून आम्ही त्याचे पालन करतो. प्रत्येक बौद्धाने या 22 प्रतिज्ञाचे पालन केले पाहिजे. धम्म दिक्षा विधी मध्ये हिंदू धर्मातून धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला या 22 प्रतिज्ञा दिल्या जातात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञाना माझा पाठिंबा आहे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
समाज माध्यमांवर काही ठिकाणी अपल्याबाबत चुकीची बातमी प्रसारित होऊन अपल्याबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहेत. मी स्वतः बौद्ध असून 22 प्रतिज्ञाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे मी कधीही 22 प्रतिज्ञाना विरोध केला नाही. जर कुठे माझ्या वक्तव्यातून तसा अर्थ बोध होत असेल तर मी स्वतः त्या शब्दांना मागे घेतो. .मात्र मी कधीही अशी भूमिका घेतली नाही.असा खुलासा आज नागपूर येथे मारवाडी फाउंडेशन पुरस्कार सोहळ्यात ना. रामदास आठवले यांनी केला आहे.
धम्मदीक्षा सोहळ्यातील 22 प्रतिज्ञाना मी कधीही विरोध केला नाही.उलट मी स्वतः बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी काम करीत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत रेसकोर्स मैदानावर धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला. त्यानुसार धम्मदिक्षा सुवर्ण महोत्सव सोहळा आम्ही मुंबईत रेसकॉर्स मैदानावर 2006 साली भव्य प्रमाणात साजरा केला होता.
जागतिक बौद्ध धम्म प्रसार संघटना असणारी वर्ल्ड बुद्धिस्ट सोसायटी च्या जागतिक उपाध्यक्ष पदी मी काम केले आहे. त्यामुळे बौद्ध धम्मदीक्षा वेळी देण्यात येणाऱ्या 22 प्रतिज्ञाना आमचा कधीही विरोध नव्हता आमचा कायम पाठिंबा आहे. त्यामुळे चुकीच्या गैरसमज पासरविणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेऊ नये आम्ही सदैव बौद्ध धम्म आणि आंबेडकरी विचारांसाठी आम्ही आयुष्य कुर्बान करून काम करीत आहोत आणि काम करीत राहू असा संदेश समाजाला आज दिला.
मारवाडी फाउंडेशन च्या वतीने विर्दभ साहीत्य संघाच्या सभागृहात प्रसिध्द कार्डालाॅजीस्ट डॉ प्रशांत वैजनाथ तामीळनाडु यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सन्मान चिन्ह व रोख रक्कम पाच लाख रुपये केंद्रीय राज्यमंत्री मा रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार अजय संचेती, डॉ वेदप्रकाश मिश्रा, गिरीश गांधी, डॉ निकुंज पवार डॉ हरीश राठी उपस्थित होते.
डॉ प्रशांत वैजनाथ यांच्या आज वाढदिवसानिमित्त…… वाढदिवसशी आम्ही त्यांना सर्व जण देत आहोत साथ….. त्याचं नाव आहे डॉ प्रशांत वैजनाथ ये नही है, अदऺर की बात ये है बाहर की बात मारवाडी समाज है बाबासाहब के साथ…… जिन्दगी का वक्त जब होता शाॅट तब देते है डॉ प्रशांत वैजनाथ नया हाॅट…….