सभासद नोंदणी करून पक्ष संघटन मजबूती करीता प्रयत्न करावा
नागपूर (लाखनी) समाचार : आज लाखनी येथील श्री अरमान धरमसारे यांच्या निवास स्थानी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी श्री पटेल यांच्या सोबत विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी खा.श्री प्रफुल पटेल म्हणाले की, आम्ही संपुआ सरकारच्या काळात (साकोली) मुंडीपार येथे (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड प्रकल्प मंजूर केला होता. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी मिळूनही हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता तसेच यावर आधारित अनेक व्यवसाय निर्माण होवून रोजगाराला चालना मिळती असती. पण विद्यमान सरकारच्या निवडून आलेल्या येथील लोकप्रतिनिधीनी कधीही याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे.
परिसरात अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही सरकार कुणाचीही असो आम्ही सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी करून जनसामान्य पर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहोचवावे असे प्रतिपादन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.
यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, राजूभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, दामाजी खंडाईत, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, विनायक बुरडे, उमराव आठोडे, नागेश पाटील वाघाये, धनु व्यास, त्रिवेणी पोहरकर, बबलू निंबेकर, अरमान धरमसारे, सचिन भैसारे, विभा हजारे, कांता निर्वान, प्रेरणा व्यास, निशा मोहनकर, मनोज टहिल्यानी, अर्चना ढेंगे, जितेंद्र बोंद्रे, मनोज पोहरकर, नूतन मेंढे, मोरेश्वर वंजारी,सुनिता निर्वाण, चेतन बांडेबुचे,, विवेक गिरीपुजे, प्रवीण बोरकर, प्रतीक गायधनी, आबिद सय्यद, शंकर भुरे, किशोर वंजारी, प्रशांत मेश्राम, सचिन उके, मन्साराम मांढरे, दिनेश निर्वान, साहिल शेख, तेजराम धूर्वे, अजय पूडके दिनेश निर्वाण, अधिर थुलकर, अशोक हजारे, निलेश गाढवे सहित लाखनी तालुका व लाखनी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.