रामटेक समाचार : खिंडसी जलाशयाच्या गाळपेर जमिनीचा लिलाव करण्यात आला. शहरातील राजीव गांधी सभागृहात लिलाव करण्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के नायब तहसीलदार मनोज वाडे यानि यशस्वीरित्या उपक्रम घेतला. दरवर्षी तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा लिलाव समारंभ होत होता, परंतु कोरोणामुळे च्या प्रादुर्भावामुळे या वर्षी हा लिलाव राजीव गांधी सभागृह रामटेक येथे घेण्यात आला. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन केले गेले व नागरिकांना सहा फूट अंतरावर बसविण्यात आले. सभागृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सैनी टाईझर करून, प्रत्येकाची स्क्रिनिंग करून व मास्क लावलेल्या नागरिकांना तसेच प्लॉट घेण्यास इच्छुक आहेत त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला.
इतर लोकांना बाहेर मैदानावर थांबिवले. या लीलावा मधे ऐकून १६ गावांच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सकाळ च्या टप्प्यात ६७ तर सायंकाळ च्या टप्प्यात ४० अश्या ऐकून १०७ सात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला दरवर्षी जून महिन्यात हा लिलाव घेण्यात येतो.
खिंडसी जलाशयाची ही गाळपेर जमीन अत्यंत सुपीक असते. खरंतर ही जमीन भूमिहीन व गरीब शेतकरयांना द्यायला हवी मात्र काही मोठे शेतकरी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन चढी बोली बोलत लिलाव घेतात त्यामुळे गरीब शेतकरी वंचित राहतात. याबाबत प्रशासनाने यात काही सुधारणा करण्यात यावी अशी मागणीही या भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केली.
कार्यक्रमात सोशल डीस्तांसिंग चा फज्जा होऊ नये महणून रामटेक प्रशासना तर्फे पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. संपूर्ण देशात कोरोना चे प्रादुर्भाव वाढले आहे, प्रत्येकाने आपल्या व आपल्या कुटंबाची काळजी घ्यावी, कुठेही बाहेर गेले तर वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, मास्क लावून च घराबाहेर पडणे, सोशल डीस्तांसिंग चा पालन करने, असे रामटेक चे तहसीलदार बाळा साहेब मस्के यांनी संपूर्ण जनतेला आवाहन केले. यशस्वीते करीता राजु तडस, कमलेश शेंद्रे, शुभांगी उगे, गजानन टापरे, रोशन ठाकरे, आदीनी प्रयत्न केले.