- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : उन्‍नतीगृहातील विद्यार्थ्‍यांचे राष्ट्रीय युवा दिनी सुर्यनमस्कार 

उन्‍नतीगृहातील विद्यार्थ्‍यांचे राष्ट्रीय युवा दिनी सुर्यनमस्कार 

नागपूर समाचार : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्‍त मैत्री परिवार संस्थेचे शुभचिंतक आणि उन्नतिग्रृहातील विद्यार्थी यांनी अंबाझरी तलावावरील स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ आयोजित सुर्यनमस्‍कार घालत ‘बलदंड भारत होवो’ असा संदेश दिला. 

यावेळी मंचावर मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, उपाध्यक्ष प्रा. विजय शहाकार, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, मैत्री परिवार संस्था गडचिरोलीचे प्रमुख निरंजन वासेकर, टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सपना कुरळकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. उन्नतीगृहातील विद्यार्थ्यांनी सुर्यनमस्कार घालुन स्वामीजींच्या बलदंड भारतच्या निर्मितीच्या उद्देशासाठी प्रयत्न केला. त्यानंतर पाच मुलांनी विवेकानंदांची वेषभूषा करुन विवेकानंदांच्या विचारांचे उत्तम रितीने सादरीकरण केले.  

प्रा. संजयजी भेंडे यांनीही आपले विचार मांडले. आभार प्रदर्शन दिलीप ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्‍या सफलतेसाठी दत्ता शिर्के, रोहित हिमते, बंडू भगत, प्रकाश रथकंठीवार, समीर वझलवार, देवेन्द्र देवगडे, संजय मार्कंडे, चंद्रशेखर पेशकर, सरोज पेशकर, प्रा. अनिल यावलकर, अरविन्द पेशकर, जयश्री पिंपुटकर, हेमंत बारस्कर, वैशाली बोपर्डीकर, विधीका जोगळेकर, हरिष जोगळेकर, चंद्रहास मुळे, अभिजीत डेहाडराय, योगेश जोशी, स्वप्निल येरपुडे, अजय टेंभेकर, सुहास कोलते, कृष्णा डेहनकर, अरविन्द गिरी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *