72 व्या इंडियन फार्मा काँग्रेस, नागपूर येथे सीईओ कॉन्क्लेव्ह आयोजित
नागपूर समाचार : नागपूर हे देशाच्या मध्यभागी स्थित आहे आणि याठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. मिहान सेझमध्ये जमीन, पाणी, वीज आणि औद्योगिक क्लस्टरच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिंदी ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्गची उपलब्धता यामुळे नागपूरला अनेक दृष्टीकोनातून व्यवहार्य बनवले आहे आणि औषध उद्योगांनीही येथे आपले क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन केंद्रीय नितीन गडकरी यांनी ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेसमध्ये फार्मा कंपन्यांचे सीईओ यांना केले. नागपूर विद्यापीठ परिसर, अमरावती रोड. याशिवाय एम्स , वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयएम आणि इतर शैक्षणिक संस्थांची उपलब्धता कुशल मनुष्यबळ देऊ शकते ज्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळू शकते असे म्हणाले.
नितीन गडकरी आणि आणि डॉ. वेणुगोपाल सोमाणी, भारताचे औषध नियंत्रक जनरल यांनी डॉ. दिलीप सांघवी- सन फार्मा, डॉ. एस. श्रीधर- फायझर इंडिया, श्री. आशिष शिरसाट- ब्लू क्रॉस, श्री. अजित सिंग-एसीजी ग्रुप, डॉ. एम. एस. मोहन- ऑर्बिक्युलर, डॉ. जे.के. शर्मा – एएमटीझेड, डॉ. कृष्णा एला- भारत बायोटेक, डॉ. संजय नवांगुल – भारत सिरम आणि लस, डॉ. राजीव गौतम- होरिबा, डॉ. रामबाबू- पल्स फार्मा, श्री. राकेश बामझाई- व्हायाट्रिस (मायलन), कु. अदिती पाणंदीकर- इंडोको रेमेडीज, डॉ. चक्रवर्ती- AVPS, श्री सुरेश शर्मा- बैद्यनाथ, श्री. अमित पेंढारकर- विको लिमिटेड, डॉ. वीरामणी – फोर्ट्स इंडिया, मि. रवलीन सिंग खुराना – नितिका फार्मास्युटिकल्स, डॉ. अन्वर दौड – झिम लॅबोरेटरीज, डॉ. महेंद्र क्षीरसागर- जेनेटेक लाइफसायन्सेस प्रा. लि., श्री श्रीधर जोशी – जे.बी. केमिकल्स, श्री पुरुषोत्तम अग्रवाल – जेनक्रेस्ट, श्री ध्रुव गलगोटिया- गलगोटिया एज्युकेशन ग्रुप, डॉ. राजकुमार धर – सीईओ, जिनूओ यांच्या सोबत चर्चा केली.
कृष्णा इला, संस्थापक अध्यक्ष भारत बायोटेक म्हणाले की, ही काँग्रेस ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि त्यांची कंपनी नागपूरला एक व्यवहार्य ठिकाण म्हणून विचार करेल. पल्स फार्मा प्रा.लि.चे देवराज रामभाऊ यांनी फार्मा उद्योगात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. डॉ. एस. श्रीधर- फायझर इंडिया यांनी टोल टॅक्स आणि किमतीच्या मुद्द्यावर लक्ष देण्याची मागणी केली. त्यांनी innovative prices and differential prices वर चर्चा केली.
डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी आपल्या समारोपाच्या टिप्पण्यांमध्ये सरकारद्वारे ऑफर केलेल्या व्यवसाय सुलभतेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नितिका प्राईस फार्मास्युटिकल्सचे सीईओ श्री रवलीन सिंग खुराना यांनी सीईओ कॉन्क्लेव्हचे संयोजन केले.