नागपूर समाचार : विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदिया परम पूज्य विष्णुदास स्वामी महाराज उपासना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दासनवमीच्या सुमुहूर्तावर दिनांक 15 फेब्रुवारी रोजी परम पूज्य श्री विजयराव देशमुख उपाख्य धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांचा सत्कार सोहळा संध्याकाळी 5.30 वाजता भवभूती रंग मंदिर, रेलटोली, गोंदिया येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद पांढुर्णा येथील परम पूज्यय ब्रह्मचैतन्य विभूदत्त महाराज श्री सुरेश जोशी उपाख्य काका महाराज भूषविणार आहेत. ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोंदियाचे सुप्रसिद्ध मा. डॉ. श्री हनुमानप्रसादजी ओझा उपस्थित राहणार आहेत.
दासनवमी निमित्त आयोजित ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध इतिहासकार असलेल्या परम पूज्य सद्गुरूदास महाराजांचे ‘शिवसमर्थयोग’ ह्या विषयावरील व्याख्यान हा गोंदियावासियांसाठी एक सुवर्णयोग आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ आणि विष्णुदास स्वामी महाराज उपासना केंद्रातर्फे करण्यात आले आहे.