नागपुर समाचार : विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि., नागपूर तर्फे दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी 2023 रोजी ‘वाघ व्हीला’ अमरावती रोड, नागपूर येथे असोसिएशन व्दारा सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले असून या सेमिनारेच उद्घाटन केन्द्रीय सड़क परिवहन आणि राजमार्ग खात्याचे मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते करण्याचे ठरले आहे. या प्रसंगी आर.बी.आयचे संचालक श्री गुरूमुर्थी मार्गदर्शन करणार आहेत.
श्री गुरुमुर्थी हे सनदी लेखापाल असून पत्रकार म्हणून त्यांचा दांडगा अनुभव आहे. तसेच या प्रसंगी नॅफकब नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री ज्योतीन्द्रभाई मेहता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. श्री ज्योतीन्द्रभाई मेहता नॅफकबचे चेअरमन आहेतच तसेच त्यांनी गुजराथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचे अध्यक्षपद देखील भुषविले आहे. सहकार क्षेत्रामधील त्यांचा प्रदीर्घ दांडगा अनुभव आहे.
सहकारी बँकांमधील गुंतवणुक या विषयावर नागपूर येथील श्री आशिष बडगे सनदी लेखापाल, आणि सायबर सेक्युरीटी या विषयावर श्री वल्लभ कोल्हटकर, सेवा निवृत महाव्यवस्थापक-आय.टी, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे हे आपले विचार मांडतील.
आर. बी. आय. चे वरिष्ठ अधिकारी आर.बी.आय.चे परिपत्रक आणि बँकिंग संबंधीत विषयांवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कमिश्नर ऑफ को-ऑपरेशन, पुणे उपस्थित राहणार आहेत.
प्रेस कॉन्फरन्सला विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष श्री रविंद्र दुरगकर, उपाध्यक्ष श्री सतीश गुप्त, सचिव श्री तुषारकांती डबले, सहसचिव श्री सुभाष देवाळकर, यांचे सोबत नागपू नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री संजय भेंडे संचालक श्री यादवराव शिरपूरकर हजर होते.