विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार “निर्धार महिला पुरस्कार – 2023” प्रदान
नागपूर समाचार : तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात योगदान देणाऱ्या जगभरातील महिला आणि मुलींचा यथोचित सन्मान करतानाच महिलांच्या दुय्यम स्थानाकडे दुर्लक्ष करून महिलांचा सर्वांगिण विकास साधणे, जुन्या रुढी-परंपरांना नाकारून महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निर्धार महिला व बाल विकास समिती च्या अध्यक्ष माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले.
निर्धार महिला व बाल विकास समिती च्या वतीने जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 126 व्या स्मृती दिनानिमित्त कुकडे ले-आऊट स्थित अत्तदीप महिला सांस्कृतिक सभागृह येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा “निर्धार महिला पुरस्कार – 2023” प्रदान कार्यक्रमात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
एस. आर. पी. एफ. च्या कमांडंट प्रियंका नारनवरे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महानगरपालिका धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, प्राकृतिक चिकित्सक किर्तिदा अजमेरा, आदी उपस्थित होत्या.
प्रियंका नारनवरे म्हणाल्या, पूर्वी महिलांना दाबून ठेवले होते. सावित्रीबाई फुले यांनी शेण-दगड अंगावर झेलून महिलांच्या शिक्षणाकरिता संघर्ष केला. जन्मत:च स्त्रियांमध्ये निसर्गाने शक्ती दिली आहे. अनेक मानसिक आव्हानं असूनदेखील नवीन पिढी घडविण्यासाठी आईने मुलांना संस्कारित करावे, समाजाला दिशा द्यावी, तेव्हाच समाजाची प्रगती होईल.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता चव्हाण, ॲड. रत्ना घाटे (सामाजिक), नॅश नुसरत अली, शोभा माहुरे (राजकीय), दीप्ती बिस्ट (शैक्षणिक), मीनल येवले (साहित्य), डीसीपी चेतना तिडके, पीआय कल्याणी हुमणे (प्रशासन), चंदा कुलसंगे (कला), कुस्तीपटू आकांक्षा चौधरी, प्रशिता जांभूळकर, (क्रीडा), मृणालिनी धानोरकर, वर्षा साखरे (उद्योग), जया जामगडे, स्नेहा भोगे (पत्रकारिता) आदींचा “निर्धार महिला पुरस्कार -2023” प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी अपर्णा लखमापुरे लिखित, दिग्दर्शित “व्यसनांची ऐसीतैसी” पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन माजी नगरसेविका वंदना भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रत्ना मेंढे, नंदा गोडघाटे, विशाखा कांबळे, ममता ढोबळे, रेखा बहादुरे, मंदा मुनेश्वर, कांता ढेपे, सुनंदा रामटेके, वंदना हिरेखण, माया जामगडे, निर्मला खडसे, किरण वाघाडे, दिव्या चव्हाण, रत्नमाला मेश्राम, आशा भटकर, आशा वानखेडे, सविता पाटील, आदींनी सहकार्य केले.