नागपूर समाचार : महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याणकारी संस्था, नागपूर तर्फे “जागतिक महिला दिना”निमित्त अंध महिलांचा सत्कार यांचा कार्यक्रम गुरुदेव सेवश्रम आग्याराम देवी चौक येथे दिनांक १६/०३/२३ रोजी पार पडला.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. अर्चनालाई डेहनकर, उद्घाटक श्री. चित्तरंजन डहरवाल, आमदार श्री. मोहनजी मते, समाज कल्याण आयुक्त सौ सुकेशिनी तेलगोटे यांचे प्रतिनिधीत्व लाभले.
अॅडवोकेट नंदिता त्रिपाठी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. कवियत्री सौ शोभा कविटकर यांनी कविता वाचन केले आणि स्त्रिरोग तज्ञ सौ कांचन सोरटे यांनी स्त्री आरोग्य समस्या यांवर माहिती दिली. त्यानंतर अंध महिलांना भेट वस्तू वितरीत करण्यात आल्या व स्वरुची भोज नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी आयोजक मंडळातील श्रीमती वंदना रोशन मेश्राम, कु. विजया वसंतराव लांबट, लिना अजय कलसे, श्रीमती रेखा घनश्याम मोटघरे, श्रीमती अश्विनी मनोज सोनटक्के, श्रीमती सुनंदा पूरी, ममता इंगळे, विनीत मोतीरामजी डहरवाल, नारायण ईंगळे, राजेंद्र साकुळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.