हाइलाइट…
- दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी
- कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाच्या पूर्व तय्यारीची पाहणी करून आढावा घेतांना
- ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे
कामठी समाचार : दिनांक 19/03/2023 कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन दिनांक 22 ते 23 मार्च 2023 रोजी विश्वविख्यात ड्रैगन पैलेस परिसरात करण्यात आले आहे. ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी आज सकाळी 7:30 वाजता महोत्सवाच्या पूर्व तय्यारीची पाहणी करून आढावा घेतला.
या प्रसंगी त्या म्हणाल्या की या महोत्सवात दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वाजता होणा-या कार्यक्रमात मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात येईल, तसेच ड्रैगन पैलेस मेट्रो स्टेशन, यात्री निवास, व आंतरराष्ट्रीय अतिथिगृहाचे भुमी पूजन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणविस राहतील. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, माजी मंत्री नसीम खान, मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. श्री. सुमंत भांगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 23 मार्च 2023 रोजी दादासाहेब कुंभारे यांच्या जिवनकार्याची ‘कर्मविर’ स्मरणीकेचे प्रकाशन भारतिय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते तसेच माजी खासदार, अध्यक्ष PRP मा. श्री. जोगेंद्र कवाडे, दीक्षाभुमी स्मारक समितिचे सदस्य, महासचिव RPI मा. डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाा-या 100 संस्थांचा सत्कार सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार सुध्दा या वेळी करण्यात येणार आहे.