मातापित्याचे छत्र हरविलेल्या अक्षराच्या शिक्षणाची घेतली जवाबदारी
हिंगणघाट समाचार : बालवयातच मात्यापित्यांचे छत्र हरविलेल्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला आपल्या मायेची छत्रछाया देत आ.समीर कुणावार यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.
कु.अक्षरा ही १२ वर्षीय कुबडे कुटुंबातील बालिका,तिच्या बालपणातच तिचे आई-वडिलाचे छत्र हरवले, तिची मोठी आई सौ.कुसुम अनिल कुबडे हिनेच तिचे पालनपोषण केले. सदर बालिका शहरातील मोहता कन्या शाळेत शिक्षण घेत आहे.
आ.समीर कुणावार यांना ही माहिती मिळताच त्यांनी दातृत्वाचा दाखला देत अनाथ मुलीचा सर्व शैक्षणिक खर्च उचलला, तिला ५ हजार ५०० रुपयेची शाळेत जाण्यासाठी सायकलसुद्धा भेट म्हणून देण्यात आली.
आ. कुणावार या दातृत्वामुळे कु अक्षराच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला असुन अक्षराने समाधान व्यक्त केले तर कुबडे कुटुंबियांनी आ. समिर कुणावार यांचे आभार मानले.