नागपूर समाचार : सुरसंगम प्रस्तुत व मैत्री परिवार संस्था नागपूर च्या सहकार्याने कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शब्दातीत शब्दप्रभू’ हा कार्यक्रम शनिवारी दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता बी. आर. ए. मुंडले हॉल, दीक्षाभूमीजवळ, साऊथ अंबाझरी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमाने मराठी रसिकांच्या भावविश्वाला समृध्द करणाऱ्या मराठी कवी आणि गीतकारांना मानाचा मुजरा सादरीकरणातुन करण्यात येईल.
या कार्यक्रमाची संकल्पना सुरभी ढोमणे यांची आहे. तर यशश्री पाठक, सारंग जोशी, अमर कुळकर्णी आणि मुकुल पांडे हे सहभागी गायक कलाकार यावेळी प्रस्तुती देणार आहेत. संहिता आणि निवेदन मुकुंद देशपांडे यांचे आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजक सचिन ढोमणे करतील तर वादक कलाकार महेंद्र ढोले, अमर शेंडे, शिवलाल यादव, मनोज चिरागले, सुभाष वानखेडे, विक्रम जोशी गायकांना साथ संगत करतील. या कार्यक्रमाला विठोबा आयुर्वेदिक दंत मंजन, पुखराज ग्रुप आणि ऑफिसमेट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.ट