नागपूर: गगन मलिक फाऊंडेशनच्या विद्यमाने येत्या ५ मे २०२३ पासून दीक्षाभूमी ते लेह लदाखपर्यंत दुसऱ्या धम्मपद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्मपद यात्रेत भारतासह देश विदेशातील हजारो भन्ते व श्रामणेर सहभागी होणार आहेत. किलोमीटरची हि धम्मपद यात्रा राहणार आहे. या यात्रेत सर्वानी सहभागी होऊन यात्रा सफल करावी. यापूर्वी परभणी ते चैत्यभूमी मुंबई अशी धम्मपद यात्रा यशस्वी झाली. भारतात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार योग्य रीतीने व्हाव्हा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नुकताच थायलंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे कास्टिंगला सुरुवात झाली. लवकरच १० पुतळे तयार करण्यात येणार आहेत. विविध शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल १० पुतळे उभारले जाणार आहेत. कास्टिंगला सिरेमणीला गगन मलिक, भन्ते वज्र मेथी, कॅप्टन नटकटी यांच्या सहथायलंडचे भन्ते गण उपस्थित होते.
येत्या १ जुलै २०२३ रोजी व्हियेतनाम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यासाठी भारतातून हजारोंच्या संख्येने बौद्ध जनतेने सहभागी व्हावे. या कार्यक्रमाला भारतातून भन्तेचे एक डेलिगेशन व्हियेतनाम येथे जाणार आहे. तसेच बौद्ध बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पत्रपरिषदेला गगन मलिक फाऊंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये, स्मिता वाकडे, पी.एस खोड वर्षा मेथान व इतर उपस्थित होते.