- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे नागपूर विभाग अधिवेशन आज, १६ एप्रिल रोजी

नागपूर समाचार : नागपूर विभागाचे अधिवेशन रविवार, दि. १६ एप्रिल २०२३ ला कमला नेहरु महाविद्यालय, सक्करदरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्षस्‍थान महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील भूषविणार असून स्‍वागताध्‍यक्ष विधान परिषद सदस्‍य आ. अभ‍िजीत वंजारी हे आहेत.

उद्घाटन कार्यक्रमाला विधानसभा सदस्य आ. सुनील केदार, आ. सुभाष धोटे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार किरण सरनाईक, ओ.बी.सी. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. 

अधिवेशनात ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर चर्चासत्र होणार असून मुंबईचे व्याख्याता विकास गरड आपले विचार मांडतील. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, खुले अधिवेशन आणि समारोप असे कार्यक्रम राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *