हाइलाइट..
- 2000 हून अधिक समाज बांधवांचा सहभाग
- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 23 एप्रिल भव्य आयोजन
नागपूर समाचार : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूरच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त रविवार, 23 एप्रिल 2023 रोजी निघणा-या भव्य रॅलीच्या तयारीला वेग आला असून रॅलीत यात सुमारे 2000 हून अधिक अधिक समाज बांधव सहभागी होणार आहेत. गोरक्षण मंदिर, वर्धा रोड येथून सकाळी 7 वाजता माजी महापौर व भाजपा नेते प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते श्री परशुराम यांचे पूजन करून 13 किलोमीटर रॅलीला प्रारंभ होणार आहे.
रॅलीमध्ये राजकीय, सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्यात संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, देवेन दस्तुरे, डॉ. चैतन्य शेंबेकर, राहूल पांडे, विवेक देशपांडे, अॅड. भानुदास कुळकर्णी, नरेंद्र जोग, अॅड. आनंद परचुरे, अजित दिवाडकर, संदीप शास्त्री, विलास काळे, शैलेश जोगळैकर, वाय. एस. देशपांडे, खांडवे गुरुजी, साधना पटवर्धन, संजय बंगाले, अरविंद गडीकर इत्यादींचा समावेश आहे.
रॅलीमध्ये भगवान श्री परशुरामाचा आकर्षक चित्ररथ राहणार असून शंखनाद केला जाणार आहे. रांगोळ्या घालून, पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणचे नागरिक रॅलीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. 13 किमीचा प्रवास करत राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे रॅलीचा समारोप होईल. रॅलीत ब्राह्मण संघटना व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले आहे.
प. पू. श्री सद्गुरूदास महाराज यांचे आशिर्वचन
रॅली निघाल्यानंतर सकाळी 9.30 वाजता गोरक्षण मंदिर, धंतोली, वर्धा मार्ग येथे धर्मभास्कर प. पू. श्री सद्गुरूदास महाराज यांचे आशिर्वचन श्रोत्यांना लाभणार आहे. भगवान श्री परशुराम शोध मंडळ आणि संस्कृत सखी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीभार्गवकवचम् चे सामूहिक पठण कार्यक्रमात सद्गुरूदास महाराज संबोधति करतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभाकर घारपुरे आणि डॉ. विजया विलास जोशी यांनी केले आहे.
13 किमी भव्य रॅलीचा मार्ग..
गोरक्षण मंदिर येथून प्रारंभ – रहाटे कॉलनी चौक – लोकमत चौक – पिकेव्ही होस्टेल चौक काचिपुरा – के. वानखेडे हॉल – शुभमंगल हॉल भगवाघर धरमपेठ – व्हीआयपी रोड ट्रॅफिक पार्क – झेंडा चौक – गिरीपेठ – मामा रोड – कॉफी हाऊस चौक – रामनगर चौक – लक्ष्मीभुवन चौक – शंकरनगर चौक – अभ्यंकरनगर चौक – माटे चौक – प्रतापनगर चौक – सोमलवार स्कूल – लंडन स्ट्रीट – मालविय नगर – खामला रोड – अर्जुना सेलिब्रेशन खामला – ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक – देवनगर चौक – तात्या टोपे हॉल – आठ रस्ता चौक – अशोका हॉटेल – राणी लक्ष्मीबाई हॉल लक्ष्मीनगर येथे समारोप.