नागपूर समाचार : नागपूरातील आऊटर हिंगणा रोड जामठा येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रस्तावित नागपूर दौरा रद्द झाल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित नाहित.
यावेळी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मुख्य इमारतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.यानंतर मान्यवरांनी रुग्णालायचा दौरा केला तेथील पदाधिका-यांनी रुग्णालायतील सेवा सुविधांची माहिती यावेळी दिली. आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच या संस्थेचे मुख्य संरक्षक देवेंद्र फडणवीस ते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत आहेत.
मध्य भारतातील कर्करोगांच्या रुग्णांसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ची स्थापना केली असून यामध्ये बालकांसाठी पेडियाट्रीक वॉर्ड मध्ये नि:शुल्क उपचार केले जात असून कॅन्सरच्या क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात एनसीआय मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा या ठिकाणी उभारल्या जाईल. थैलसेमिया सिकलसेल या आजारावर देखील येथे संशोधन होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
केंद्रीय मंत्री यावेळी उद्बोधन करताना म्हणाले की, या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकलसेलवर अधिक संशोधन आणि उपचार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे ही आनंदाची बाब असून पूर्व विदर्भातील रुग्णांना याचा लाभ होईल. याशिवाय कॅन्सर मुक्त भारत यासाठी एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची प्रशंसा केली. येथील जनरल वार्ड सुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा असून येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. कॅन्सरसारख्या आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.