अभिनय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वानंद सांस्कृतिक मंडळाचे रौप्य महोत्सवी आयोजन
नागपूर, 3 मे 2023
स्वानंद सांस्कृतिक मंडळ व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे ते 1 जुन दरम्यान घेण्यात येत असलेल्या रजत महोत्सवी अभिनय कार्यशाळेला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ आहे.
दादीबाई देशमुख, हिंदू मुलींची शाळा, महाल येथे आयोजित या कार्यशाळेच्या उदघाटन स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मागील 25 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या कार्यशाळेतून अनेक कलाकार घडले असून नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका अश्या विविध क्षेत्रात कार्यशाळेत घडलेले कलाकार काम करताना दिसतात. लेखन, दिग्दर्शन, नट त्याचप्रमाणे तांत्रिक बाजू सांभाळणारे अनेक तंत्रज्ञ या कार्यशाळेने तयार केले आहेत. मुलांमधील कलागुणांना वाव देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे, असे म्हणत त्यांनी स्वानंद सांस्कृतिक मंडळाच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाचे कौतूक केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, सीमा फडणवीस, सुबोध आष्टीकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक नाट्य प्रशिक्षक रोशन नंदवंशी यांनी केले तर सूत्र संचालन उर्वशी डावरे यांनी केले. पल्लवी देशमुख यांनी आभार मानले. केले. ही कार्यशाळा 1 जूनपर्यंत दररोज सकाळी 8 ते 11 या वेळेत घेण्यात येत असून इच्छूक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.