- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : परमबिर सिंग यांचे निलंबन रद्दचा आदेश आरोपीला संरक्षण देणारा – प्रविण कुंटे

नागपूर समाचार : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांचे निलंबन नुकतेच राज्य सरकारने परत घेतले. कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागीतला होता तो न दिल्याने कॅटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थीत करीत परमबिर सिंग याचे निलंबन रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर व आरोपीला संरक्षण देणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस प्रविण कुंटे पाटील यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांचे विरोधात राज्यातील वेगवेगळया पोलिस स्टेशनमध्ये किमान 8 ते 10 गुन्हे दाखल असून यात खंडणी, कायदयाचा दुरउपायोग व बदल्यांमध्ये वसुली सारखे गंभीर घटनांची नोंद आहे. प्रसिध्द उदयोगपती मुकेश अंबाणी यांच्या घरासमोर जे जिलेटीन ठेवण्यात आले त्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा परमबिर सिंगच आहे आणि त्यामुळे त्यांची खालच्या पदावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली केली.

तसेच या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या NIA ने कोर्टात जे आरोपत्र दाखल केले आहे त्यात सुध्दा परमबिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य रोल होता असे नमुद केले आहे. अंबाणी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदिप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने परमबिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असतांना सुद्धा त्यांच्यावर कारवाही न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे असे ताशेरे सुध्दा ओढले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबिर सिंग यांनी आरोप केले आणि ते फरार झाले.

त्यांनी कोर्टात किंवा न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या समोर अनेक वेळा विचारणा करुन सुध्दा कोणतेही पुरावे सादर केले नाही. उलट मी केवळ ऐकीव माहीतीवर हे आरोप केले असून याचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथपत्र सादर केले. परंतु त्यांच्या खोटया आरोपांवरुन अनिल देशमुख यांना 14 महिने तुरुगांत ठेवण्यात आले. न्यायालयाने जामीन देतांना अनिल देशमुख यांच्यावरील आरोप ऐकीव माहितीवर असून कोणतेही पुरावे नसल्याचे सांगीतले. परमबिर सिंग याचा राजकिय वापर करुन अनिल देशमुख यांना फसविण्यात आले.परमबिर सिंग यांच्या मागे एका अदृश्य राजकिय शक्तीचा हात होता असा आम्ही वारंवार आरोप करीत होतो.

कॅटला राज्य सरकारने अहवाल न देणे आणि कॅटने एकतर्फी दिलेल्या आदेशाचा वापर करीत राज्य सरकारने त्यांचे निलंबन रद्द करणे. यावरुन अनिल देशमुख यांना फसविण्यासाठी परमबिर सिंग यांचा वापर कोणत्या

अदृश्य हातांनी केला होता हे आता समोर आले आहे. आवाज दाबण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस भारतीय जनता पार्टी व सरकारच्या विरोधात जो बोलतो त्यांचा आवाज दाबण्याचे काम राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे. यासाठी ते विविध केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करीत असुन श्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई, नवाब मलीक यांची अटक तसेच हसन मुशरीफ यांच्या घरावर छापेमारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस हा याबद्दलचा सबळ पुरावा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे राज्यभर फिरुन भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. जो आपल्या विरोधात बोलेल त्याला आत टाका हा भाजपाचा एकसुत्री कार्यक्रम असून राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अश्या हकुमशाही प्रवृत्तीकडे न झुकता रस्त्यावर उतरुण संघर्ष करीत राहील.

प्रविण कुंटे पाटील प्रवक्ता व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अनिल अहिरकर, दिदीप पनकुले, वर्षा, या प्रसंगी प्रदेश पदाधिकारी सर्वश्री दिनानाथ पड़ोळे अनिद, वेदप्रकाश आर्य, बजरंग सिंग शामकुळे, श्रीकांत शिवणेकर परिहार- सौ आभा पोडे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *