हिंगणघाट समाचार :आ. समिर कुणावार यांचे कुशल नेतृत्वाखाली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दिनांक 15 रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील पोहना सर्कलमधील भिवापूर- गांगापुर गावातील युवा कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील चहुमुखी विकास पहाता त्यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
आज दिनांक 15 मे रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोहणा सर्कल मधील भिवापूर गांगापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये रीतसर प्रवेश देण्यात आला, यात प्रामुख्याने अमोल वाघ, सौ. जयाताई संतोष चांदोरे सरपंच , सौ. रूपालीताई गोविंद नैताम उपसरपंच, चंदाताई गजानन कोल्हे सदस्य, प्रमोद धाडवे, निखिल कोल्हे , गजानन हुलके, गजानन कोल्हे, नयन कोल्हे, दिनेश बटे, कुंडलिक बरडे, अजय धाडवे, विठ्ठल गोंदे, पांडू बंदार, विशाल वाघ, गोपाल वाघ , सौरभ सेवेकार, रमेश घोडे , अरविंद डंभारे, सुदाम कळसकर, प्रतीक फाटे, बालू चांदोरे, वैभव हुलके, लक्ष्मण नाकतोडे, निलेश फाटे, राजेंद्र पोहणकार, गोविंद नैताम, राजेंद्र आत्राम, विलास मरसकोल्हे, साहेबराव चिडाम, मधुकर चिडाम, भाऊराव नैताम, रामाजी उईके, कुंदाबाई चिडाम, निर्मला नैताम, ईश्वर नैताम, ताणबाजी राऊत, विलास राऊत, प्रवीण महाजन, रुपेश वानखेडे, गोलू धोटे या युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचेसह माजी जिल्हा परिषद सभापती माधवरावजी चंदनखेडे, भाजपा तालुका अध्यक्ष आकाशभाऊ पोहाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट संचालक घनश्यामजी येरलेकार, कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर संचालक वामनरावजी चंदनखेडे, माजी पंचायत समिती सभापती गंगाधररावजी कोल्हे, भाजपा तालुका महामंत्री विनोद भाऊ विटाळे, भाजपा तालुका महामंत्री भाग्येश देशमुख, चंदू भाऊ माळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.