- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शंकरनगर चौक मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव द्या… शिवसेनेची मागणी

नागपूर समाचार : “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर “यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शंकरनगर येथील मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव देण्याची मागणी विदर्भ संपर्क प्रमुख किरण भाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सौ मनीषा पापडकर यांनी मेट्रो व्यवस्थापक यांना केली, आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील त्यातून नागपूरकरांसाठी गौरवशाली पिढ्याचे निर्माण होईल, शहरात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे कामे होत आहे त्याला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वाची महापुरुषांची नावे देणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे

नागपूर महानगरपालिकेने प्रत्येक नगर व चौकाला नावानुसार मेट्रो स्टेशनचे नाव देण्यात आले आहे. परतू शंकरनगर चौकाचे 4 दशकापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा लावलेल्या आहे मग मेट्रो स्टेशनला शंकर नगर चौक असे नाव का दिले आहे? चारही कोपऱ्यात मनपाच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चौकाच्या पाट्या लागलेल्या आहेत, तर शंकरनगर मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकर मेट्रो स्टेशन नाव का देण्यात आले नाही ? सावरकरांना मनपा, मेट्रो विसरली का ? आपण लवकरात लवकर मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन मेट्रो चे उपमहाव्यवस्थापक ( PR ) मा. अखिलेश हळवे यांना दिले.

याप्रसंगी जिल्हा संघटिका सौ. मनीषा पापडकर, विभाग संघटिका मंजुषा पाणबुडे, विभाग प्रमुख पुनम चाडगे, विभाग प्रमुख पिंकी काकडे, प्रभाग प्रमुख पिंकी गावंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *