BRS चे शक्तीप्रदर्शन नागपुरात, कार्यकर्त्यांची अतोनात गर्दी
नागपूर समाचार : भारत राष्ट्र समितीचा विदर्भातील पहिला कार्यकर्ता मेळावा सोमवारी रेशीम बागेतील कविवर्य सुरेशभट या सभागृहात पार पडला असून विदर्भाच्या सर्व दुरून आलेल्या कार्यकर्त्यांनी ही अतोनात गर्दी केली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे टाळ्यांच्या कडकडात कार्यक्रमाच्या स्थळी आगमन झाले व कार्यकर्त्यांनी उभे राहून त्यांचे मनापासून स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारा लावत “अबकी बार किसान सरकार, नारा नही, ये निर्धार है असे म्हणत सभागृहात टाळ्यांचा गडगडात झाला. नागपूर शहराला आपण ग्रीन सिटी म्हणतो. परंतु तेलंगणा चे केसीआर मुख्यामंत्री येताच नागपूर नगरी सिटी गुलाबी झेंड्यांनी फुलून गेली. जणू काही 15 जून रोजी गुलाबी सिटी दिसत होती. हे आश्चर्याची बाब आहे.
अशाप्रकारे सीटीमध्ये जागोजागी मुख्यमंत्र्याचे बॅनर आणि गुलाबी झेंडे व तोरणे रोडवर लावलेले दिसत होते. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी भरभरून सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.