- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बापरे बाप, महाकालीनगर चौकात खड्डेच खड्डे ? काय हि रोडची दुर्दशा !

नागपूर समाचार : दक्षिण नागपूर प्र.क्र. 34 मधील तपस्या चौका पासून जो रोड अमरनगर कडे जाणारा रोड आहे त्या रोडवरील महाकाली नगर चौकात, एवढे खड्डे पडले आहेत आहे की, पायी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास होतो व वाहन चालकांची कोंडी मोंडी झाली आहे. याकडे कोणीही ढोकून पाहत नाही. जेव्हापासून नगरसेवकाचे पद गेलंय तेव्हापासून प्रशासन लक्ष देत नाही.

कृपा करून नगरसेवकांना जबाबदारी सोपवावी म्हणजे रोडची दुर्दशा चांगली होईल. असं नागरिकांना वाटत आहे. पण काय करणार ? निवडणूक होत नाही ? कधी निवडणूक होते, आज होते, उद्या होते, परवा होते, महानगर पालिकेची निवडणुक होणे गरजेचे आहे. नगरसेवक आतुरतेने वाट पाहत आहे. पण प्रशासन जे म्हणेल त्याचप्रमाणे कामे होईल. ते पण काय करू शकतात.

पण सध्याची रोडची स्थिती बिकट आहे. बघा याकडे कोणीही लक्ष देत नाही. नगरसेवकांना अधिकार तर नाहीच म्हणून महाकाली नगर चौकातील नागरिकांनी अधिकार हातात घेऊन ठरविले की, आपण मनपाच्या विरोधात आंदोलन करूया, रोडची दुर्दशा काय आहे ? या रोडवर अपघात होऊ शकतात रात्रीच दोन गाड्यांमध्ये भांडण झालेला आहे.

ती परिस्थिती पाहता बघा काय चाललंय, जर कारवाई नाही केल्यास, एरियातील नागरिक व एकता दुकानदार संघटना तसेच सर्व एकत्रितपणे येऊन दिपक खेडकर, किशोर पवार, लविश बिनेवाले, गुरदास कावळे, हेमंत वाघाडे, विवेक ठाकरे, शाहू पवार, देवरावजी प्रधान, विकास हिंगे, डॉ. बडवाईक, मधुकर सातपुते, महेश मानकर, अडवोकेट नानोटे, मोतीरामजी शिरसाट, गोतमारे काकाजी, राजू वाघाडे, पवन घाडगे, विकी राजकुमार, गणेशराव दलाल, अशोक भिलकर, मुधळकर पान ठेला, विक्रांत दलाल, आणि राहुल पडोळे आदींनी आंदोलनांचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *