नागपुर समाचार : मोरया फाउंडेशन प्रस्तुत आनंदी सोहळा २०२३ या कार्यक्रमा अंतर्गत सक्षम महिलांना राणी मणीकर्णिका पुरस्कार देण्यात आला तसेच अंध विद्यालयातील दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे कार्याध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, श्रीपाद अपराजित सर संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपुर, न्यायमूर्ती अनिताताई गिरडकर, दिपाताई आगे उप अधिक्षक मध्यवर्ती कारागृह नागपुर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत झालेल्या उखाणा स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, अश्या विविध स्पर्धा मधे १०० च्या वर महिला सहभागी झाल्या. आणि विजेत्याला आकर्षण पारितोषिके मोरया फाउंडेशन तर्फे देण्यात आली तसेच कार्यक्रमात उपस्थीत प्रत्येक महिलेला भेटवस्तु देण्यात आली. अभिनेता आशीष पवार हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.