दीक्षाभूमीवरील देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्या : प्रदीप मून
नागपुर समाचार : नागपूरच्या दीक्षाभूमीला जागतिक बुद्धांचे श्रद्धास्थान मानले जाते. परंतु या ठिकाणी अनेक मूलभूत सुविधा आणि आवश्यक गरजांचा पुर्तेतेचा अभाव आहे. जसे की शिर्डी, शेगाव, पंढरपूर या ठिकाणी लाखों भावीक दर्शनाला येतात परंतु त्या ठिकाणी वरील पायाभूत सुविधांची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.
त्या बरोबरच नागपूरच्या दीक्षाभूमीला शासनाने जागतिक तीर्थस्थळाचा दर्जा दिला असतांनाही शिर्डी, शेगाव, पंढरपूरच्या तुलनेत १ % ही मूलभूत सोयी – सुविधा गेल्या कित्येक वर्षापासून उपलब्ध नाहीत. याबद्दल बौद्ध उपासक व उपाशीकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात दीक्षाभूमीवरील साफसफाई, निर्मळ पाण्याची जागोजागी व्यवस्था, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या निवासांची व्यवस्था, सौंदयकरण, मुतारी, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश योजना नसल्याने जीवित हानी होऊ शकते म्हणून यासंदर्भात प्रदीप मून यांच्या मार्गदर्शनात खालील निवेदन देण्यात आले. यावेळी तीनशेहून अधिक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या निवेदनावर स्मारक समितीच्या सचिवांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा महिलांनी दिलेला आहे. प्रदीप मुन यांनी माहीती दिली आहे.