नागपूर समाचार : दक्षिण नागपुरातील अध्यापक नगर येथे योग क्लब मधील तेथिल योग क्लब च्या भगिनींनी शनिवारी 29 जुलै रोजी अध्यापक नगरात गार्डन तसेच खाली जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.
जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यासाठी वृक्ष हे उत्तम पर्याय आहेत. हे जाणून घेऊनच योग क्लबच्या भगिनींनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबविला व जोमाने सुरू केला.
याप्रसंगी रेखा ढोले, छाया तिडके, विद्या खडसे, ज्योती लाखे, विद्या टेकाडे, संध्या गायधने, माया काकडे, नलिनी पद्माकर, शुभांगी किरपाने, अपर्णा टेकाडे, सुनिता धारपुरे, बेबी बिजलेकर, योगिता नारनवरे, मीनाक्षी मुटे, छाया कुरटकर, सुरेखा निखारे, कविता पाटील, प्राची भस्मे, प्रिया खापेकर, कुसुम बुरघाटे, सविता गुल्हाने, सुषमा तरस, रेश्मा डेकाटे या सर्व महिलांचे सहकार्य लाभले व यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला.