नागपूर समाचार : अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना, जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावणीसाठी भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होत असलेल्या भूजल पातळीची घसरण थांबविण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच काटोल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले.
एक दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, नायब तहसीलदार विजय डांगोरे, मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता श्री. सोनोने, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पूर्णत: केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून काटोल व नरखेड तालुक्यातील 71 ग्रामपंचायत मधील 122 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये मागणीवर आधारित पाणी बचतीच्या उपाययोजनांची कामे व पुरवठा आधारित जलसंधारण, पुनर्भरण उपाययोजना, जलयुक्त शिवार 2.0, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण अशा विविध विभागाच्या योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार आहे.
या योजना पुर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये 122 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये मागणीवर आधारित पाणी बचतीच्या उपाययोजनेची कामे, जलयुक्त शिवार 2.0, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली.
तालुकास्तरीय प्रशिक्षणास तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता ल. पा. जि. प., उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि प, उप अभियंता, जलसंपदा, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सर्व तज्ञ, जिल्हा अमलबजावणी भागीदारी संस्थेचे समन्वयक तज्ञ व समूह संघटक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर, निलेश खंडारे, माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी तज्ज्ञ, दर्शन दुरबुळे, जलसंवर्धन तज्ज्ञ, प्रतिक हेडाऊ, कृषी तज्ज्ञ श्री. बांगडे यांनी परिश्रम घेतले.