नागपूर समाचार : ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याचा रक्षा बंधन कार्यक्रम प्रशासकीय अधिकाऱ्यांना राखी बांधून, समस्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. बेसा – पिपळा नगरपंचायत च्या नगर विकास विभागाचे प्रशासक भारत बा. नंदनवार यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, जिल्हा संघटक रेखा भोंगाडे, जिल्हा सचिव मुकुंद अडेवार संपर्क प्रमुख प्रशांत लांजेवार, उपाध्यक्ष अर्चना पांडे, अश्विनी मेश्राम, स्वाती वंजारी, कविता बोबडे, माजी सरपंच शालिनी कंगाले, माजी सरपंच सुरेंद्र बानाईत, ज्योती द्विवेदी, माजी नगरसेविका माधवी राजुरकर, कल्पना पराते, मनीष पडोळे, सुधा उपाध्याय, ममता सोहले, कांता जी आदी उपस्थित होते.
मानकापूर पोलिस स्टेशन, ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नागपूर जिल्हा मानकापूर प्रमुख वैशाली तळवेकर यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, सहाय्यक फौजदार नितीन वाघुले, पोलीस हवालदार गजानन वाघ, पोलीस वासुदेव नारखेडे, शेखर अरसाद, दयाराम जाधव, सोनाली कांबळे, रुमाली इंगळे, अश्विनी राठोड आदींना राखी बांधण्यात आली.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, सचिव लीलाधर लोहरे, जिल्हा अध्यक्ष डॉ. बिप्लब मजुमदार, संपर्क प्रमुख प्रशांत लांजेवार, मानकापूर प्रमुख वैशाली तळवेकर, विजय खनके, राखी लांडगे, पूजा बागडे, कोमल दुपारे, मेघा घोंगळे, डॉ मंगला बावणे, सुविधि जयस्वाल, उर्मिला बोरीकर हे उपस्थित होते.