नागपूर समाचार : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विश्व हिंदू परिषद स्थापना दिन व श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेची स्थापना 1964 साली जन्माष्ठमी च्या दिवशी झाली, हिंदू धर्म संरक्षण आणि संवर्धनाचे उद्दिष्ठ ठेवत गेल्या 59 वर्ष पासून विहीप कार्यरत आहे. या वर्षी विश्व हिंदू परिषद स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत असून त्या अनुषंगाने शोभयात्रेचे भव्यप्रमाणात आयोजन होणार आहे.
रविवार, दिनांक 10 सप्टेंबर रोजी, गोरक्षण सभा, धंतोली येथून दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार असून थाडेश्वरी राम मंदिराचे श्री श्री १००८ महामंडलेश्वर माधवदास महाराज यांच्या हस्ते तथा केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे पूजन होऊन ही शोभायात्रा प्रारंभ होणार आहे.
शोभयात्रेत विभिन्न विभागातून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होणार असून शोभयात्रेत विभिन्न सामाजिक, संस्कृतिक विषयांवर आधारित ४० झाक्या राहणार आहेत, पूज्य संत श्री भागीरथ महाराज यांच्या उपस्थितित सरपी आश्रमचे १०० भक्तांचे भजन मंडळ शोभायात्रेत सहभागी होणार आहे. नागपुरातील ३ ढोलताशा पथक शोभयात्रेतील मुख्य चौकात वादन करणार आहेत.
शोभायात्रा गौरक्षण सभा येथून प्रारंभ होऊन लोकमत चौक, पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, बर्डी मेन रोड, मानस चौक, कॉटन मार्केट चौक करीत गीता मंदिर येथे स्वामी निर्मलानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदोत्सवने समाप्त होणार आहे, असे पत्रकार परिषदेत शोभयात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष कृष्णदत्त (भैय्याजी) चौबे यांनी संगीतले पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ सुदर्शनजी शेंडे, प्रांत मंत्री प्रशांत तितरे, नागपुर महानगर मंत्री अमोल ठाकरे शोभयात्रा समितीचे सयोजक नंदकिशोर दंडारे, राम पलंदुरकर, प्रशांत मिश्रा, बजरंग दल, नागपुर प्रांत संयोजक लखन कुरील, सुरक्षा प्रमुख ऋषभ अरखेल इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.