नागपूर समाचार : यावर्षी श्री मीनाक्षी मंदिर, मदुराई, तामिळनाडू या सुप्रसिध्द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकार करण्यात आली आहे. श्री मीनाक्षी देवी ची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार, गोंधळ, आरती, प्रसाद, भोग तसेच मीनाक्षी देवीच्या साक्षात दर्शनाचा लाभ नागपूरकरांना नागपूरातच व्हावा हा उद्देश्य घेवून मंडळाने श्री मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा मानस केलेला आहे.
श्री मीनाक्षी देवीच्या दर्शना सोबतच तेथील प्राचीन इतिहास, परंपरा, संस्कृती, पुजापाठ, प्रसाद वितरण व आपण मदुराईला येवून साक्षात श्री मीनाक्षी देवीचेच दर्शन घेत आहोत असे हुबेहुब वातावरण नागपूरातच तयार करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मीनाक्षी मंदिरात होणारी रोज आरती व प्रसाद येथे वाजता संपन्न होणार आहे. श्रींच्या व मिनाक्षी देवीच्या आगमनाच्या दिवशी सर्व महीला व पुरूष कार्यकर्ते भारतीय परंपरागत वेशभुषेमध्ये मिरवणुकीत सम्मीलीत होतील.
नागपूरातील अग्रगण्य शिवमुद्रा व गजवक ढोलताशा पथकाच्या जवळपास ५०० वादकांच्या गजरात श्रींचे भव्य दिव्य मिरवणूकेने दुपारी २ वाजता आगमन होणार आहे. असा हा भव्य-दिव्य सोहळा यशस्वी करण्याकरीता मंडळाला विविध कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. त्यात आदित्य अनघा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, दि एकता महिला सहकारी संस्था, सुवर्ण महिला सहकारी संस्था, विल्स इलेक्ट्रीकल्स, तिरुपती बालाजी शिक्षण संस्था, बलोकार ज्वेलर्स अॅण्ड साडीस, एव्हिस फिटनेस स्टुडियो, दत्तकृपा महिला को-ऑप. सोसायटी, गृहिणी प्रॉडक्टस, लिव्हरेज ग्रुप, रमेश ज्वेलर्स, राजसन्स हार्डवेअर इत्यादींचे प्रायोजकत्व लाभलेले आहे.
तसेच या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन सावेतच विवीध सामाजीक उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच एक दिवस रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे तसेच मेटल डिटेक्टर, अग्नीसुरक्षा यंत्र त्याच प्रमाणे १५-२० सुरक्षाकर्मी तैनात राहणार आहेत व मंडळाचे जवळपास १५० ते २०० महिला व पुरूष कार्यकर्ते भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज राहतील. उपरोक्त उत्सवाकरीता मुर्तीकार राकेश पाठराबे सजावट श्रीकांत डेकोरेशन, (संदिप मुंबर, श्रीकांत तल्हार) सुमंगल डेकोरेशन व कलकत्ता, पुणे, भोपाळ व मुंबई येथून आलेले ५० कलाकार विद्युत व्यवस्था बबलु इलेक्ट्रीकल्स ध्वनी व्यवस्था-प्रशांत साऊंड सर्विस यांची आहे.
पत्रपरिषदेला संयोजक संजय चिंचोले यांनी संबोधित केले. या प्रसंगी राजेश श्रीमानकर, अनिल वलोकर, दिनेश चावरे, सुनिल साऊरकर, हृदेश दुबे, मंगेश वड्याळकर, मुकुंद सपकाळ, अनिल जोशी, प्रदीप वड्याळकर, राजू गुप्ता रोहन बोरकर, इ. उपस्थित होते.