- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली पूरसदृश्य परिस्थितीची पाहणी

नागपूर समाचार : नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती नंतर झालेल्या नुकसानाची राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.24) रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपमुख्यमंत्री यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआउट, डागा लेआउट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अधीक्षक अभियंता मनोज तलेवार घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, श्री. अजय मानकर, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव श्री संदीप जोशी, माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार, माजी नगरसेवक सर्वश्री. अविनाश ठाकरे, प्रमोद चिखले, प्रदीप पोहाणे, रमेश शिंगारे, गोपाल बोहरे, लहूकुमार बेहते, दिलीप दिवे,माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, पल्लवी शामकुळे, अश्विनी जिचकार, परिणीता फुके, यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट पासून पाहण्याची सुरुवात केली. पाहणी दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरसदृश्य परिस्थितीची माहिती दिली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवर फ्लो झाल्याने जवळपास परिसरात पाणी जमा झाले होते. आता हे पाणी कमी होत असून, नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या कार्याची पाहणी करीत घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. 

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कौस्तुभ अपार्टमेंट, चाणक्य अपार्टमेंट सह सचिन पुरोहित, अरुणा पुरोहित, कन्हैया कटारे,विजय होले कोळवाडकर, सुनील जाधव यांच्याशी संवाद साधला.

मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत श्री. कृष्णा बनाई, श्री. विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पंचनामे करून लागणारी मदत दिली जाणार असल्याचे ग्वाही यावेळी दिले. तसेच पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत.जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणीस यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *