नागपूर समाचार : विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सि. एस. ठवळे यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले व उपस्थितांना आधुनिक शिक्षणाचे महत्व सांगितले.
ग्रंथपाल मिनाक्षी कांबळे यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचनाचे महत्व सांगून शासकीय ग्रंथालयातर्फे वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यानी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 आँक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येत असल्याचे सांगून डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी वाचकांना माहिती दिली.
यावेळी विभागीय व जिल्हा ग्रंथालयातील अधिकारी कर्मचारी ग्रंथालयातील वाचक अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी उपस्थित होते.