- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मतदार नोंदणीचे काम युध्दस्तरावर करा – डॉ. विपीन इटनकर

वमतदारांची नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापकांनी स्विकारावी निवडणूक विषयक आढावा बैठक

नागपूर समाचार  : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचीटक्केवारीत वाढ करणे फार महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्वांनी मतदार नोंदणीचे कामयुध्दस्तरावर करावे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामात गतीआणा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीनिवडणूक यंत्रणेस दिले. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदारनोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओंसोबत मतदार नोंदणी विषयक आढावा बैठक स्व. वसंतरावदेशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, महापालिकेचेअतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यावेळीउपस्थित होते. दिवाळी जवळ येत असून दोन महिन्यात मतदारनोंदणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा. 75 हजार नवमतदारांची नोंदणीचे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी जबाबदारीघेऊन नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

पर्यवेक्षक व बीएलओंनी गांभीर्यानेयाकामात लक्ष देऊन मर्यादेत मतदार नोंदणी, मयत मतदारांचे नाव वगळणे व दुय्यम मतदारवगळणे, मतदार यादी शुध्दीकरण आदींसाठी नमुना क्र. 6, 7 व 8 भरुन घेण्यासाठी पुन्हा घरोघरी भेटी द्याव्यात. या कामात हयगय करणाऱ्यांवरकारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक विभागाच्या पत्रानुसार मयत मतदारवगळण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्राची अट नाही. बीएलओंनी पंचनामा करावा किंवा त्यांच्या मयताच्या नातेवाईकांकडूननमुना भरुन घ्यावा. निवडणूक पर्यवेक्षकांनी दररोज बीएलओकडून अहवाल घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *