खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन स्थळाचे भूमिपूजन
नागपूर समाचार : क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावंताना सहजरित्या ऐकता यावे, त्यांचा कलांचा अनुभव नागपुरातील सामान्य व्यक्तींना घेता, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न आता खासदार सांस्कृतिक, क्रीडा महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. नितीन गडकरींची ही संकल्पना देशातील अनेक खासदारांना प्रेरणादायी ठरली असून त्यांनीदेखील आपल्या मतदारसंघांमध्ये असे महोत्सव सुरू केले आहे, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव -2023’ चे यंदा 24 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर देशमुख कॉलेज मैदान, क्रीडा चौक, नागपूर येथे होणा-या या महोत्सवाच्या स्थळाचे भूमिपूजन रविवारी माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, संजय भेंडे, डॉ. मिलिंद माने, बंटी कुकडे तसेच, खासदार सांस्कृतिक समितीचे सदस्य उपस्थित होते.
समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. यंदा मनोरंजन, आध्यात्मिक, धार्मिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राजेश बागडी यांनी आभार मानले.
महोत्सवाच्या सफलतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.