नागपुर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 20 हजार चौ.फूट आकाराचा भव्य मंच तयार झाला असून मैदान हजारो लाईट्सच्या प्रकाशात उजळले आहे.
ध्वनी व्यवस्था, आसन व्यवस्था पूर्ण झाली असून पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, 20 टॉयलेटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेकडे देखील विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सात प्रवेशद्वारांवर चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात येणार आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी 9 एलएडी स्क्रीनदेखील लावण्यात आले आहेत.
बारा दिवसाच्या या महोत्सवाच्या नि:शुल्क पासेस 91588 80522 वर क्रमांकावर मिस कॉल दिल्यास रसिकांना घरबसल्या ‘ऑनलाईन’ पासेस प्राप्त करता येतील. या पासेस अहस्तांतरणीय राहतील याची नोंद घ्यावी. याशिवाय, कार्यक्रम स्थळीदेखील तसेच, श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, ऑरेंज सिटी चौक, नागपूर येथे प्रत्येक दिवसाच्या सायंकाळाच्या सत्रातील कार्यक्रमाच्या पासेस, त्याच दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत प्राप्त करता येतील. याशिवाय, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे डिजिटल चॅनेल सुरू करण्यात आले असून व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असलेल्या https://whatsapp.com/channel/0029VaEObkx2UPBAtNMrL21g या चॅनेलला फॉलो केल्यास महोत्सवाचे सर्व अपडेट्स मोबाईलवर प्राप्त करता येतील.