- Breaking News

नागपुर समाचार : श्री हनुमान चालिसा पठणाने वातावरण झाले भक्‍तीमय 

नागपुर समाचार : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या दुस-या दिवशीची पहाट श्री हनुमान चालिसा पठणाने भक्‍तीमय झाली. ईश्‍वर देशमुख शार‍ीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पर‍िसरात सकाळी सुमारे 1000 भाविकांनी एक सूर आणि एक तालात ‘जय हनुमान ज्ञान गुन सागर’ चा जागर करीत वातावरण पवित्र केले. 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने आयोज‍ित ‘जागर भक्‍तीचा’ या सकाळच्‍या सत्रातील उपक्रमाला शनिवारी श्री हनुमान चालिसा पठणाने प्रारभ झाला. सकाळच्‍या सत्रातील या उपक्रमासाठी सहा वाजेपासूनच ईश्‍वर देशमुख शारी‍र‍िक शिक्षण महाविद्यालयाच्‍या परिसरात हनुमानभक्‍तांची गर्दी जमायला प्रारंभ झाला होता.

पोद्दारेश्‍वर राम मंदिराचे संस्‍थापक रामकृष्‍ण पोतदार यांच्‍या हस्‍ते श्री हनुमानजींच्‍या प्रतिमेच्‍या पूजनाने पठणाला प्रारंभ करण्‍यात आला. वेद फाऊंडेशनचे अध्‍यक्ष खेमराज दमाहे यांच्‍या संयोजनात व जय श्रीराम सेवा संघटनेचे तेजांश दीक्षित व चमूच्‍या सहकार्याने भाविकांनी श्री हनुमान चालिसाची पाच आवर्तने एका सुरात सादर केली.

एक तास चाललेल्‍या या पठणाने परिसरातील वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाला कांचनताई गडकरी व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍या सदस्‍यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *