- Breaking News

कामठी समाचार : आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल चा 24वा सथापणा दिन

हाइलाइट….

  • स्लग:-ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या स्थापना दिनानिमित्त 27 व 28 नोव्हेंबर दोन दिवसीय ड्रॅगन फेस्टिवल चे आयोजन
  • –ड्रॅगन पॅलेस स्थापना दिनानिमित्त आज 27 नोव्हेंबर ला उपमुख्यमंत्रीच्या हस्ते होणार ‘फूड कोर्ट ‘चे उदघाटन
  • स्लग:- सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना व राहुल भोसले यांचा ‘बुद्ध ही बुद्ध ‘प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम
  • स्लग:-28 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी व प्रसेनजीत कोसंबी यांचा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम  

कामठी समाचार : कार्तिक पोर्णिमेच्या पावन पर्वावर आज सोमवार 27 नोव्हेंबर ला वैभवसंपन्न, शांतीशिल्प, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 24 वा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयच्या वतीने 27 व 28 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. 

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या स्थापना दिनानिमित्त आज 27 नोव्हेंबर सोमवार ला सकाळी 11 वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेलोशीप असोसिएशन व निचिरेन शु सोनेनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पूज्य भदंत वल निचियु(काणसेन)मोचीदा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना संपन्न होईल.

याप्रसंगी जवळपास 30 बुद्ध विहाराचे प्रमुख भिक्खू संघाचा सुद्धा सहभाग राहणार आहे.दुपारी दीड वाजता ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल तसेच अप्रतिम ‘फूड कोर्ट’ उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी तसेच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगुंटीवार हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच लोकसभा सदस्य कृपाल तुमाणे, विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले, विधांनपरिषद सदस्य प्रवीण दटके, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जैस्वाल, आमदार सुनील केदार, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते,आमदार विकास ठाकरे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेशकुमार, नागपूर मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूर सुधार प्रण्यास सभापती मनोजकुमार सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

उल्लेखनीय आहे की उदघाटन होऊ घातलेल्या भव्य दिव्य उभारण्यात आलेला ‘फूड कोर्ट’राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून व सामाजिक न्याय विभागाच्या अर्थ सहाय्यातून निर्मिती करण्यात आले आहे.या अप्रतिम फूड कोर्ट चे आर्किटेक्चर डिझाईन सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान यांनी केले तर स्ट्रक्चरल डिझाईन दिलीप मसे यांनी केले आहे.या फूड कोर्ट च्या बांधकामा करिता 15 हुन अधिक एजेंसीने आपले योगदान दिले असून या फूड कोर्ट च्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला लाखोंच्या संख्येत भाग घेणाऱ्या भविकाना विविध व्यंजनाचा आस्वाद घेता येईल.

ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल अंतर्गत 27 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजता कामठी येथील विविध शाळेतील महाविद्यालयातील तसेच हरदास हायस्कुल ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल सह स्थानिक कलावतांना विविध प्रबोधनपर सामाजिक सांस्कृतीक कार्यक्रम सादर करता येणार आहे.यासाठी कामठी शहरातील 25 च्या जवळपास विद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला असून यातील उत्कृष्ट कलावंतांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता मुंबई चे इंडियन आयडल फेम राहूल सक्सेना व सारेगामा फेम मुंबई चे राहुल भोसले यांचा ‘बुद्ध ही बुद्ध ‘ प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

तर 28 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता कामठी येथील विद्यालय, महाविद्यालय येथील सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक कार्यक्रमाची स्पर्धा होईल तर सायंकाळी 5 वाजता संतोष सावंत व संच यांचा मुंबई बँड व म्युजिक मेडिटेशन कार्यक्रम सादर होणार आहे तर सायंकाळी 7 वाजता मुंबई येथील प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी व संच यांचा प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.याप्रसंगी मुंबई च्या सिने कलाकार किशोरी शहाणे व टाईमपास चित्रपट फेम प्रथमेश परब विशेष उपस्थित राहणार आहेत. तसेच ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल च्या निमित्ताने 27 व 28 नोव्हेंबर ला ड्रॅगन पॅलेस परिसरात प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून ही प्रदर्शनी सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत लोकांकरिता उपलब्ध राहील. तसेच या प्रदर्शनित लघु,सूक्ष्म,व मध्यम विभाग,खादी ग्राम उद्योग ,हातमाग विभाग , वस्त्रोद्योग,महिला बचत गट,स्वयंसेवी संस्था व इतर संस्थांचा सहभाग राहणार आहे.या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल च्या यशस्वीतेसाठी ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी, हरदास विद्यालय,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र व इतर सामाजिक संस्थेतील पदाधिकारी ,

शिक्षकवृंद,

धम्मसेवक व धम्मसेविका अथक परिश्रम घेत आहेत.ड्रॅगन पॅलेस स्थापणा दिनानिमित्त आयोजित या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चा जास्तीत जास्त संख्येतील लोकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.

बॉक्स:-डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन झालेल्या पुज्यनिय भिक्खू संघाचे स्वागत

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त 27 नोव्हेंबर ला सकाळी 10 वाजता होणाऱ्या विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेलोशिप असोसिएशन व निचिरेन शु सोंनेनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पूज्य भदंत निचियु(काणसेन) मोचीदा व विशेष पुज्यनिय भिक्खू संघ आज सकाळी नागपूर च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पोहोचताच या पुज्यनिय भिक्खू संघाच्या आगमनाचे ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी च्या वतीने ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या विशेष उपस्थितीत स्वागत करण्यात आले.याप्रसंगी अजय कदम, दिपंकर गणवीर, तिलक गजभिये, अश्फाक कुरेशी, उदास बन्सोड,वंदना भगत, सुकेशीनी मुरारकर,रेखा भावे, रजनी लिंगायत, नंदा गोडघाटे, अनुभव पाटील, मनीष डोंगरे ,सुशिल तायडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *