नागपूर समाचार : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी’ चा गाजर करीत खासदार सांस्कृतिक महोत्सवातील ‘जागर भक्तीचा’ या उपक्रमात शुक्रवारी सकाळी विष्णुसहस्त्रनाम आणि गीतेच्या १५व्या अध्यायाचे पठण अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
वे.शा.सं. देवेश्वर गुरुजी आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘विष्णुसहस्त्रनाम’ स्तोत्राला सुरुवात केली आणि हजारो भक्तांनी त्यांच्यासह वाचन करून ‘विष्णुसहस्त्रनाम’ आणि ‘गीतेच्या १५व्या’ अध्यायाचे सामूहिक पठण केले. सकाळच्या प्रहाराची ऊर्जा, सामूहिक पठण ध्वनी, एकत्रित पूजा अर्चना या सर्वांनी वातावरण आध्यामिक आणि सकारात्मक झाल्याचे चित्र होते.
कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, पुरुषोत्तम पाठक आणि सौ. पाठक, दिलीप रोडी आणि सौ रोडी, देवेश्वर गुरुजी, वंदना कुलकर्णी, सुजाता काथोटे, मनीषा दुबे ,विश्वनाथ कुंभलकर, विजय फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा अर्चना, विष्णु प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत मुळे यांनी केले.