आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि.०४ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील पोहणा सर्कल मधील भिवापूर व गांगापूर गावातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळा आज दि. ०४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने विजय पोहनकर, पांडुरंग भोयर, विठ्ठल जुगनाके, हेमंत कडू, गणेश कुडमेथे, राजेंद्र भलाम, गोविंदा नैताम ,मंगेश आलम, प्रशांत बलांडे, मयूर भोयर, मोहन घोडाम ,विनोद येटे, राहुल हांडे, विलास मरसकोल्हे, अंकुश मेश्राम, विजय शेंडे, ऋतिक वांडरे, गोलू वखरे, अमोल पारधी, ईश्वर नैताम, निलेश मरसकोल्हे, ज्ञानेश्वर गोंदे, ईश्वर मेश्राम, वासुदेव गोंदे, अरुणराव बरडे, रमेश घोडे, रोशन कोडापे, पांडुरंग खंदार, सोनू मेश्राम, वर्षा सराटे, मंजुषा सेवेकर, नारायण कुंभरे, रोशन सराटे, दिनकर घोडे, परमेश्वर सराटे, आकाश सराटे, बालू मारुती तोडासे, गजू राऊत इत्यादी रीतसर कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाने, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, समदपूर माजी नगराध्यक्ष गजूभाऊ राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक प्रफुल्ल बाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम येरलेकर, विकास इंगळे, जांगोना येथील सरपंच नितीन वाघ, छायाताई नितीन आंबटकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.