- Breaking News, नागपुर समाचार, मनोरंजन

नागपूर समाचार : म‍िका सिंग यांचा ‘दमादम’ परफॉर्मन्‍स; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा थाटात समारोप

नागपूर समाचार : तरुणाईच्‍या हृदयावर राज्‍य करणारे पार्श्‍वगायक, रॅपर, संगीतकार म‍िका सिंग यांचे मंचावर आगमन होताच ईश्‍वर देशमुख शारी‍र‍िक शिक्षण महाव‍िद्यालयाच्‍या तुफान गर्दीमध्‍ये अचानक उत्‍साह संचारला आणि पुढचे दोन तास म‍िका स‍िंग ने दमादम परफॉर्मन्‍स देत चाहत्‍यांना गायला, नाचायला भाग पाडले. 

24 डिसेंबरपासून ईश्‍वर देशमुख शारीर‍िक महाविद्यालयाच्‍या पटांगणावर सुरू असलेल्‍या खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाचा आज बाराव्‍या दिवशी म‍िका सिंग यांच्‍या लाईव्‍ह कॉन्‍सर्टने समारोप झाला. पटांगणावर दुपारी चार वाजेपासूनच तरुणाईने गर्दी करायला सुरुवात केली. प्रत्‍येक गेटवर लांबच लांब रांगा दिसू लागल्‍या. सायंकाळपर्यंत पटांगण खचाखच भरून गेले होते. आकाशात ढगांची दाटून आलेली असताना, वातावरणात चांगला गारवा जाणवत असताना म‍िका सिंगने चाहत्‍यांमध्‍ये आपल्‍या गाण्‍यांनी गर्मी भरली. 

समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जीएसटीचे अव‍िनाश थेटे, डब्‍ल्‍यूसीएलचे सीएमडी मनोज कुमार, टाईम्‍स ऑफ इंड‍ियाचे संपादक पार्था मैत्रा, हॉटेल सेंटर पॉइंटचे सीएमडी म‍िक्‍की अरोरा, तरुण भारतचे संपादक गजानन न‍िमदेव, पखवासा आयुर्वेद‍िक कॉलेजचे प्राचार्य मृत्‍यूंजय शर्मा, राजे मुधोजी भोसले यांची उपस्‍थ‍िती होती. गजवक्र ढोलताशा व ध्‍वज पथकांच्‍या धमाकेदार वादनाने समारोपीय कार्यक्रमाला प्रारंभ झाला. 

‘दमादम मस्‍त कलंदर’ या गीताने म‍िका सिंगने मंचावर आगमन केले. ‘कसे काय नागपूर, मी तुमच्‍यावर खूप प्रेम करतो’, म‍िकाने सर्वांची मने ज‍िंकून घेतली. ‘मौजा ही मौजा’, ‘अपनी तो जैसे तैसे’, ‘ओ ओ जाने जाना’, ‘अख‍ियों से गोली मारे’, ‘दिल में बजी ग‍िटार’ अशी एकाहून धडाकेबाज गाणी सादर केली. शिट्टया, टाळ्यांचा नुसताच कल्‍ला झाला.     

नितीन गडकरी यांचा बडे भाईसाहाब असा उल्‍लेख करत म‍िका सिंगने त्‍यांच्‍या आंतराष्‍ट्रीय दर्जाच्‍या हावेज आणि इतर कामाचे कौतुक केले. ‘झुम उठा सारा नागपूर, छा गया सारा खासदार में’ असे म‍िकाने सर्वांना थिरकायला भाग पाडले. ‘है सेलिब्रेशन, नाचो दमादम, आज की पार्टी नितीन गडकरी सर की तरफ से’ म्‍हणत एकच कल्‍ला केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभले.

सहकार्यासाठी सत्‍कार 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्‍यासर्वांचा यावेळी नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यात ईश्‍वर देशमुख शा. श‍ि. महाविद्यालयाचे रमेश दुरुगकर, प्राचार्य शारदा नायडू, दर्शन पांडे, संदीप बारस्‍कर, आलीम भाई, प्रसन्‍ना अटाळकर, सनी जयस्‍वाल, दीपक साठवणे, विवेक ढाक्रस, सुबोध मांजरे, दीपाली हरदास, रोहिणी माकोडे, वर्षा रेहपांडे, अनुप गाडगे, संदीप कुळकर्णी, रवी कासखेडीकर, ऋचा धावडे, राजेश वनकर, शश‍िकांत मानापुरे, व‍िवेक दुबे, विवेक केळझरकर, म‍िक्‍की बक्षी, एसीपी बिरादर, एसीपी शिंदे व पीआय ताकसांडे, मृत्‍यूंजय म‍िश्रा यांचा समावेश होता.

महोत्‍सवात बालसंस्‍कारांना अधिक महत्‍त्‍व – नितीन गडकरी  

लहान मुले ही देशाचे भविष्‍य असतात. सुजाण नागरिक घडवायचा असेल तर याच वयात मुलांवर चांगले संस्‍कार व्‍हावे या उद्देशाने यावर्षीच्‍या खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाची आखणी केली होती. इत‍िहास, संस्‍कृती, परंपरा, कला, लोककला असे मनावर संस्‍कार करणारे कार्यक्रम लहानांसाठी सादर करण्‍यात आले. शिवाय, भक्‍तीचा जागर करण्‍यात आला. आंतरराष्‍ट्रीय कलाकारांसोबत स्‍थान‍िक कलाकारांना कला सादर करण्‍याची संधी देण्‍यात आली, असे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महोत्‍सव यशस्‍वी केल्‍याबद्दल सर्व नागपूरकरांचे आभार मानले व ज्‍यांची गैरसोय झाली त्‍यांची क्षमा माग‍ितली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *