नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांची घोडदौड सुरू केली आहे.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत रविवार (ता. 14) रोजी पुरुषांच्या स्पर्धेत सुर्वण भारत क्रीडा मंडळ खापरखेडा संघाने विद्यार्थी युवक युवक क्रीडा मंडळ जुना सुभेदार संघावर 39-24 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
साई क्रीडा मंडळ काटोल संघाने महाराणा प्रताप क्रीडा मंडळ गडचिरोली संघावर 34-12 अशा मोठ्या गुणफरकाने विजय नोंदविला.
निकाल : पुरूष गट
1) रामटेक साईराम क्रीडा मंडळ संघाने धर्मवीर क्रीडा मंडळ पारशिवनी संघावर 34-16 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
2) श्री गजानन क्रीडा मंडळ नागपूर संघाने हनुमान नगर व्यायाम शाळा काटोल संघावर 23-16 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
3) सुभाष क्रीडा मंडळ कॉटन मार्केट नागपूर संघाने स्वतंत्र शिवाजीनगर नागपूर संघाचा 21-14 अशा गुणफरकाने
पराभव केला.
4)बजरंग क्रीडा मंडळ संघाने जय बजरंग क्रीडा मंडळ संघावर 37 -18 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
5) मराठा लाईन्स वानाडोंगरी संघाने सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट संघावर 32-16 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
6) मेळघाट क्रीडा मंडळ धारणी संघाने स्टार क्रीडा मंडळ अकोला संघावर 50-30 अशा गुण फरकाने विजय नोंदविला.
7) एकलव्य क्रीडा मंडळ संघाने गरजा क्रीडा मंडळ वर्धा संघावर 35-12 अशा गुणफारकांनी विजयी नोंदविला.
निकाल : महिला गट
1) मराठा लॉन्स क्रीडा मंडळ महाल संघाने शिवगर्जना क्रीडा मंडळ रामटेक संघावर 35-13 अशा गुण फरकाने विजय नोंदविला.
2) रेणुका क्रीडा मंडळ अजनी संघाने केसरी क्रीडा मंडळ कळमेश्वर संघावर 32-12 अशा गुण फरकाने विजय नोंदविला.
3) रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघाने विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ सुभेदार संघावर 29-04 अशा मोठ्या गुण फरकाने विजय नोंदविला.
4) संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर संघाने श्री साई क्रीडा मंडळ नागपूर संघावर 22-20 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.
5) त्रिरत्न क्रीडा मंडळ कामठी संघाने विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ जुनासुभेदार संघावर 43-11 अशा मोठ्या गुण फरकाने विजयी नोंदविला.