नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत गुरूवारी (ता. १७) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेतील सबज्यूनिअर्स गटात नीरव घारपुरे आणि आरोही चकोले यांनी आपापल्या वजन गटात यश मिळवित सुवर्ण पदक पटकाविले.
12 वर्षाखालील मुलांच्या सबज्यूनिअर्समध्ये 25 किलोखालील वजनगटात नीरवने शास्वत ढेंगेला मात देत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकावर नाव कोरले. शास्वतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शियान तिरपुडेने कांस्य तर अर्णव भुंबरने दुस-या क्रमांकाचे कांस्य पदक मिळविले. 12 वर्षाखालील मुलींच्या सबज्यूनिअर्समध्ये 24 किलोखालील वजनगटात आरोही चकोलेने स्मितल सोनकुसरे विरुद्ध सुवर्ण पदक पटकाविले. या सामन्यात स्मितलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कृती गणवीर आणि संचिता पडोळे यांनी कांस्य पदक आपल्या नावे केले.