नागपूर समाचार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत शुक्रवारी (ता. १९) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेतील सबज्यूनिअर्स गटात मेधांश शंभरकर आणि प्राची चौधरी यांनी आपापल्या वजन गटात यश मिळवित सुवर्ण पदक पटकाविले.
१२ वर्षाखालील मुलांच्या सबज्यूनिअर्समध्ये ३२ किलोखालील वजनगटात मेधांश शंभरकरने तन्मय निनावे याला मात देत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकावर नाव कोरले. तन्मयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर नक्ष बावणेने कांस्य व अथर्व जंजाले यांना दुस-या क्रमांकाच्या कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय १२ वर्षाखालील मुलींच्या सबज्यूनिअर्समध्ये २६ किलोखालील वजनगटात प्राची चौधरीने शरनय वैद्यला मात देत सुवर्ण पदक पटकाविले. या सामन्यात शरनयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर सना ग्रोवारने कांस्य प्रथम आणि सिद्धी पडोळेने कांस्य द्वितीय पदक आपल्या नावे केले.