नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शुक्रवारी (ता.19) 14 वर्षाखालील मुली आणि मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. मनपा शाळा बाबुळबन वर्धमाननगर येथे झालेल्या स्पर्धेच्या 39 किलोखालील वजनगटात मुलींमध्ये हिंदू विद्या च्या अनन्या प्रसाद हिने मुलींमध्ये तर मुलांमध्ये हिंदू विद्या च्या मयंक आंबेकरने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली.
14 वर्षाखालील मुलींमध्ये राणी दुर्गावती संघाच्या भाविका पारधीने रौप्य तर आर.एस. अकादमीच्या विधी विश्वकर्मा आणि हिंदू विद्याच्या त्रिशा घोडकेने कांस्य पदक पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांमध्ये 39 किलोखालील वजनगटात मयंक आंबेकर (हिंदू विद्या) सुवर्ण, श्लोक ठाकरे (शाहू गार्डन) रौप्य अनुज कावळे (सेंट क्लॅरेट) आणि देवांशू डाबरकर (सेंट क्लॅरेट) यांनी कांस्य पदक पटकाविले.