- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि. २१ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्ड व मुजुमदार वॉर्ड येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २१ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने प्रमोद जुमडे, विष्णू नारनवरे, रणजीत गौरखेडे, पुरुषोत्तम भजगवळी, सतीश मुंजेवार, कृणाल थुल, सूरिन सागर, पंकज मरापे, मनोज कांबळे, रवी चव्हाण, भारत हर्षे, सुरज नंदनवार, जितेंद्र नंदनवार, महेंद्र नंदनवार, विष्णू गौरखेडे, गौरव बनसोड, अजय वरभे, समीर मुपीडवार, शंकर खुडसंगे, श्रीकृष्ण मेश्राम , पराग हरगुडे, मारुती जंगटे, प्रदीप झामरे, अजय राऊत, मोहिनी आढणेवार, जयाताई डुमरे, यशोदा नंदागवळी, बेबीबाई चिकाटे, पूजा जुमडे ,संगीता नारनवरे, शोभा नारनवरे, संगीता मुसेवार, राखी यादव, अनुराधा झोरे, सुनंदा गुरनुले, प्रदीप मुप्पीडवार, महेश निखोडे, सचिन गेलगंदेवार, विकास मरसकोल्हे ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, समाजसेवक पुरुषोत्तम भजगवळी, येनोरा येथील सरपंच श्री. योगेश बोंडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर पक्ष सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *