देशाचे भविष्य घडविण्यासाठी एकल अभियानाचे कार्य : प्र-कुलगुरू संजय दुधे
नागपूर समाचार : देशाचे भविष्य मुले आहेत. एकल अभियान या मुलांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कौशल्य विकसीत करून त्यांना घडविण्याचे महान कार्य करत आहे. या समर्पित कार्यातून देश लवकरच विश्वगुरू बनेल, असा विश्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.संजय दुधे यांनी व्यक्त केला.
एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी, एकल अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी श्री माधवेंद्र सिंह जी उपस्थित होते.
प्र-कुलगुरू प्रा. संजय दुधे यांनी खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. एवढ्या व्यापक प्रमाणात करण्यात आलेल्या आयोजनाबद्दल त्यांनी एकल अभियानाच्या कार्याचे देखील विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचे कार्य कठीण असून ते यशस्वीरित्या एकल ने पार पाडल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. खेळातून अनेक प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळते. नागपूर विद्यापीठाद्वारे अनेक गरजू प्रतिभावंत खेळाडूंना दत्तक घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात चित्राताई जोशी यांनी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, भारत ही भूमी स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. भारत हा देश एक मातीचा तुकडा नसून ती आई आहे. भारत माता आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न तयार करते. माणसाच्या तिन्ही आवश्यकता आपली मातृभूमी पूर्ण करते. त्यामुळे याच मातीत खेळून खेळाच्या माध्यमातून आपला विकास करायचे ध्येय बाळगा. स्वत:च्या हितासाठी नव्हे तर देशासाठी सुवर्ण पदक जिंकू या ध्येयाने खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले. श्रीमती चित्राताई जोशी यांनी खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पुरस्कार जिंकणा-या मीराबाई चानू यांचे उदाहरण देउन प्रोत्साहित केले.
तसेच चित्राताई जोशी यांनी यावेळी दुस-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोपाची घोषणा करण्यात करून पुढील वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद ओडिसाकडे देण्यात आल्याची देखील घोषणा केली.
खेळाडूंनी घेतली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती
पुरस्कार वितरणानंतर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अयोध्या येथे सुरू असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या देशभरातील खेळाडूंनी यावेळी ‘जयश्रीराम’च्या घोषणा देत आनंद व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रमोद अग्निहोत्री यांनी केले तर आभार एकल ग्राम संगठनच्या सचिव दीपाली गाडगे यांनी मानले.
कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा : वरघडे भावंडांना सुवर्णपदक
एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्तीमध्ये महाराष्ट्रचा दबदबा राहिला. ४५ आणि ४८ किलो वजनगटात भावेश आणि अर्जुन वरघडे या दोन्ही भावंडांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली.
कुस्तीमध्ये ४५ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या भावेश अर्जुन वरघडे ने दक्षिण उत्तरप्रदेशच्या सुरज ला पछाडून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर ४८ किलो वजनगटात गौरव अर्जुन वरघडे याने दक्षिण झारखंडच्या रोहित कुमारला चितपट देत विजय मिळविला.
कबड्डीमध्ये उत्तराखंड, महाकौशलला विजेतेपद
एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील कबड्डीच्या अंतिम सामन्यात महाकौशल संघाने मुलांमध्ये तर उत्तराखंड संघाने मुलींमधून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या स्पर्धेत महाकोशल संघाने ब्रजमंडल संघाचा ३२-२० असा पराभव केला. महाकौशल संघाचा सुखदेव उत्कृष्ट खेळाडू ठरला. मुलींमध्ये पूर्व उत्तरप्रदेश संघाला ४९-२३ ने नमवून उत्तराखंड संघाने विजेतेपद जिंकले. संघाची भूमिका उत्कृष्ट खेळाडू ठरली.
निकाल
कुस्ती
४५ किलो वजनगट : विजेता – भावेश अर्जुन वरघडे (महाराष्ट्र), उपविजेता – सुरज (मध्य उत्तरप्रदेश)
४८ किलो वजनगट : विजेता – गौरव वरघडे (महाराष्ट्र), उपविजेता – रोहित कुमार (दक्षिण झारखंड)
५१ किलो वजनगट : विजेता – देवा (पश्चिम उत्तरप्रदेश), उपविजेता – कुलदीप यादव (मध्य उत्तरप्रदेश)
५५ किलो वजनगट : विजेता – धर्मराज (पूर्व उत्तरप्रदेश), उपविजेता – मोलायम कुमार (उत्तर बिहार)
मुली : उंच उडी
सिखामोनी पेगू (पूर्व पूर्वोत्तर) १.३५ मीटर, नेहा कुमारी (दक्षिण बिहार) १.३३ मीटर, प्रियंका कोराम (छत्तीसगढ) १.३० मीटर
मुले : उंच उडी
आर्यन कौशल (उत्तर हिमाचल) १.६३ मीटर, भूबन इंगटी (पश्चिम पूर्वोत्तर) १.५९ मीटर, करण कुमार (पूर्व उत्तरप्रदेश) १.५९ मीटर.
मुली : २०० मीटर दौड
सौमिका घोष (पं.बंगाल) २७.४८ सेकंद, रिशा सैकिया (पुर्वी पुर्वोत्तर) २८.३५ से., दिव्यांशी (पश्चिम उत्तरप्रदेश) २८.६६ से.
मुले : २०० मीटर दौड
राहुल पेगू (पुर्वी पुर्वोत्तर) २३.६० से., उज्ज्वल कुमार (पश्चिम उत्तरप्रदेश) २३.९२ से., अनूज सिंग (मध्य उत्तरप्रदेश) २४.११ से.
मुली : ४०० मीटर दौड
आरती यादव (पूर्व उत्तरप्रदेश) १.०४.५१ मि., सौमिका घोष (पं. बंगाल) १.०८.६० मि., रागिनी (दक्षिण उत्तरप्रदेश) १.०९.१३ मि.
मुले : ४०० मीटर दौड
लवलेश सरोज (दक्षिण उत्तरप्रदेश) ५३.११ से., अरूण कुमार (पश्चिम उत्तरप्रदेश), ५३.४८ से., बालचंद बेदिया (दक्षिण झारखंड) ५४.०७ से.
योगासन
पुरूष : हर्षित कुमार गौर (छत्तीसगड) ५०, आशिष कुमार नामेदव (महाकोसल) ४९.०५, आशिष कुमार (मध्य उत्तरप्रदेश) ४९.
महिला : डिम्पी गोगई हंडिके (पुर्वी पुर्वोत्तर) ४९.०५, पुष्पा देवी (दक्षिण उत्तरप्रदेश) ४९, सुप्रिया भारती (उत्तर बिहार) ४८.०५