नागपूर समाचार : जिल्ह्यामध्ये 4, लाख 42 हजार 897 घरातील 22 लाख 14 हजार 485 लोकसंख्या तपासली जात आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार हे सर्वेक्षण करण्यात येत असून जिल्हयात ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केल्यानंतर तेराही तालुक्यामध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये निर्धारित लोकसंख्येची तपासणी करण्यासाठी 6 हजार 678 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे.
राज्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिला आहेत. ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.