आदिवासी गोंड गोवारी जमात व समाजाचा उपोषणाचा तिसरा दिवस
नागपुर समाचार : गणराज्य दिन २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) आदिवासी समाजाचे बांधव संविधान चौकात दुपारी 12 वाजतापासून उपोषणाला बसलेले होते. आज दि २८ जाने वारी चा उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य केलेल्या नाहीत. आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र व अनुसूचित जमातीचे इतरही लाभ मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील २३ नोव्हेंबर, १९९४ रोजी आपल्या हक्कासाठी मोर्चा काढलेल्या ११४ आदिवासी बांधवांचे बळी गेले. मात्र, त्या गोंड गोवारी बांधवांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यांचा लढा आजही सुरूच आहे. आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने कैलास राऊत यांनी सांगितले की 28 जानेवारी रोजी परिणय फुके यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. आणि आपलं शिष्टमंडळ घेऊन मुंबईला यावे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं करून तुमच्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन डॉ. परिणय फुके यांनी कैलास राऊत व शिष्टमंडळाला दिले.