मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पंचवार्षिक निवडणुक
नागपूर समाचार : विदर्भातील सर्वात जुनी संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाली.या निवडणुकीत श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे नेतृत्वात शिवशाही पॅनल, प्रदीप घोरपडे यांचे नेतृत्वात आदर्श पॅनल व मिलिंद साबळे यांचे नेतृत्वात सुराज्य पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. संस्थेच्या आजिव सभासदांनी मोठ्या उत्साहात व विक्रमी मताधिक्याने श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे नेतृत्वातील शिवशाही पॅनल मधील सर्वच्या सर्व १६ उमेदवार निवडून दिले. ते खालीप्रमाणे आहेत.
1.श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले अध्यक्ष
2.श्री प्रविण शिर्के कार्याध्यक्ष
3.श्री शिरीष राजेशिर्के उपाध्यक्ष
4.श्री दिलीप सस्ते उपाध्यक्ष
5.श्री राजेश काटे उपाध्यक्ष
6.श्री निलेश चव्हाण कोषाध्यक्ष
7.डॉ.प्रकाश मोहिते मुख्य सचिव
8.श्री प्रशांत (बालू) भोसले सचिव
9.श्री अनुप जाधव कार्यालयीन सचिव
10.श्री नरेंद्र मोहिते सदस्य
11.श्री महेंद्र (राजा) शिंदे सदस्य
12.श्री अविनाश घोगले सदस्य
13.सौ.अनिता जाधव सदस्या
14.सौ.ममता भोसले सदस्या
15.श्री सतीश मोहिते सदस्य
16.श्री हरीश इंगळे सदस्य
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड नितीन देशमुख यांनी कामकाज पाहिले.