- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे “जागतिक महिला दिना” निमित्त पर्यटक महिलांसाठी विशेष सवलत

नागपूर समाचार : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन खाते, राज्यसरकार तसेच केंद्र शासनाचा पर्यटन विभाग पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशिल असून पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतोल यावाचत प्रयत्न करीत आहेत.

रामटेक, आंभोरा धार्मिक यात्रास्थळे, नवेगाव, नागझिरा, ताडोबा, बोर, मेळघाट अभयारण्य, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण, खेकरानाला, खिडसी, बोरडॅम, घोडाझरी, चंद्रपूर जलाशय, बोदलकसा जलाशय, चांदपूर, खामतलाव, सेवाग्राम, पवनार, आनंदवन हेमलकसा सामाजिक उथानाचे केंद्र, सितावडीं किल्ला, नगरधन, चांदा, गावोलगड, नरनाळा किल्ले इत्यादी विविध प्रकारची स्थळे विद्यमान आहेत.

• विदर्भातिल पर्यटन स्थळावर महामंडळाने पर्यटक निवास आणि इतर सुविधा खालीलप्रमाणे आहेत.

जिल्हा पर्यटन स्थळ

नागपुर, सिल्ल्लारी, रामटेक, खेकरानाला, अआंभोरा, खिंडसी, नागपुर, साकोली, पवनी, भंडारा, गोंदिया, बोदलकसा, वर्धा, बोरधरण, चंद्रपुर, ताडोबा, मोहली, अमरावती, चिखलदरा

महामंडळाचे नविन पर्यटक निवास

१. भंडारा जिल्हयातील चांदपुर येथे महामंडळाने पर्यटक निवासाची उभारणी केलेली आहे, चांदपुर पर्यटक निवास लवकरच पर्यटकांकरीता खुले करण्यात येणार आहे.

२. गोंदिया जिल्हयातील नवेगावचांध येथे महामंडळाने पर्यटक निवासाची उभारणी केलेली आहे. नवेगावबाध

पर्यटक निवास लवकरच पर्यटकांकरीता खुले करण्यात येणार आहे.

३. चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अभयारण्याच्या कोलारा गेट जवळ नलेश्वर येथे महामंडळाने पर्यटक निवासाची उभारणी केलेली आहे, सदर पर्यटक निवासाचे काम प्रगतीपथावर येणार आहे.

४. यवतमाळ जिल्हयातील सहस्त्रकुंड आणि टिपेश्वर येथे पर्यटक निवासाचे काम प्रगतीपथावर आहे. 

महामंडळाच्या मोकळ्या जमिनीचा विकास

१. भंडारा जिल्हातील गोसीखुर्द धरणावर जल पर्यटन प्रकल्प सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मोदी व जामगांव येथे ५.७६ हे. आर. जागा शासनाने मंजूर केली आहे. गोसीखुर्द जलाशयात जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याकरीता महाराष्ट्र शासनाने रू.१०१.१५ कोटी किमतीच्या प्रकल्पास दि.१९/१२/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. लवकरच जन पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे भंडारा जिल्हयाचा पर्यटन विकास होऊन नविन रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

२. नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नवेगावखेरी येथील मोकळ्या जमीनीचा पर्यटन दृष्टया विकास करण्याकरीता प्रस्ताव शासनाचे विचाराधीन आहे.

पर्यटन विकासाकरीता पर्यटन मंत्री मा. श्री. गिरीश महाजन, श्रीमती श्रध्दा जोशी, व्यवस्थापकीय संचालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री. दिनेश कांबळे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक. मपविम, नागपूर व अमरावती यांचे महत्वपुर्ण सहकार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *